जळगाव ( प्रतिनिधी ) – २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्याक्षिकांचे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ या थीम अंतर्गत योगा डे चे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे व रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव तसेच योगशिक्षक प्रा. महेश एन पाटील सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थीत होते.योग प्रात्याक्षिकासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.महेश एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापकवृंद यांनी योग प्रात्याक्षिक केले. या उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.