जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे सारा संकुल येथे योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. चंद्रय्या कांते, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डीन डॉ. आर.के. मिश्रा, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रवीण कोल्हे, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व सांगितले. त्यानंतर, अंशिता वर्मा,हर्षदा चौधरी,छाया नरनवरे,अदिती घाटे,करिश्मा मुंदडा,दृष्टि पोपट,भाग्यश्री पाटील, जान्हवी सोमाणी, डॉ. शुभम केंदरे,डॉ. ऋतुजा शार्दूल, डॉ. महविश शेख, डॉ. आस्था पटेल,डॉ. वैश्णवी टिकार,डॉ. प्रज्वल भिवगडे,डॉ. सुदेश वायदंडे,डॉ. उमैर मुक्री,गणेश पुंड प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी योग प्रात्याक्षिक करून योग दिन साजरा केला. या कार्यक्रमात ४९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.