अमळनेर (प्रतिनिधी) – जि. प. सदस्या संगीता भील यांच्या नेतृत्वाखाली बोदर्डे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध तालुक्यातील बोदर्डे ग्रामपंचायत सलग दुसऱ्यांदा बिन विरोध करण्याची परपरा कायम ठेवली आहे.

यात सदस्यपदी आशाबाई शामराव भील, सुनंदा अंकुश पारधी, अर्चना संदीप पाटील, शीतल अविनाश पाटील, ईश्वर श्रावण भील, प्रवीण सुपडू सांदांशिव, सरुबई शत्रुघ्न भील, नाना रामभाऊ पारधी, नितीन डीगंबर पाटील हे सदस्य पदी निवडून आले आहेत. गावात मागील,पंचवार्षिकही बिन विरोध ग्रामपंचायत निवडणूक झाल्याने विविध विकास कामे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून पूर्ण केली. त्याच धर्तीवर सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सत्कार प्रसंगी तीच परंपरा कायम ठेवण्याचं आश्वासन दिले.
यासाठी जि प सदस्या संगीता भील तसेच संजीव पाटिल प्रदीप पाटील,संतोष चौधरी,विकास भील,भुरा भिल, दौलत बोरसे, अरुण पाटिल,भगवान पारधी शांताराम पाटील,विकास पाटील अशोक भील,अशोक पाटिल, भगवान पाटिल,संजू पाटील,संजय युवराज पाटील,दिलीप पाटील,उजण लाला संदनशिव, चंद्रकांत संदांशिव तसेच सर्व ग्रामस्थांनी यांनी परिश्रम घेतले.







