• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना चाचण्या आणि लोकांमधील गैरसमज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2020
in जळगाव
0

 

कोरोनाने लोकांना बरेच काही शिकविले मग ते आत्मनिर्भयतेपासून अगदी वैद्यकीय तपासण्यांपर्यंत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याविना कुठेतरी वाचून तपासण्यांचे अपूर्ण ज्ञान असल्याने अनेक संभ्रम व भीती निर्माण होतांना दिसते आहे. वायरल टेस्टचा अंतिम निष्कर्ष रुग्णाच्या लक्षणांवर अवलंबून नसून हा चाचणीचा दिवस व शरीरातील वायरल लोड ह्यावर अवलंबून असतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास लक्षणे दिसत नाही अशावेळी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मात्र स्वतःहूनच तर्क वितर्क लावले जातात. भारतात कोरोनाची साथ आल्यापासून संशोधनाने वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येऊ लागल्या. सुरवातीस घशातील स्त्राव घेऊन कोरोनाची लागण झाली आहे हे समजायला लागले व त्यामुळे रुग्णाचे उपचार व विलगीकरण करणे शक्य झाले. परंतु टेस्टला लागणारा वेळ अधिक असल्याने रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येऊ लागली. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर लोकांची तपासणी होऊ लागली. ह्या टेस्टमुळे अगदी कमी वेळात समजते की रुग्ण बाधित आहे किंवा नाही. हे झाले करोना बाधित रुग्णांच्या बाबतीत. मग रुग्ण करोनामुक्त झाला आहे हे कसे समजायचे?  त्याकरिता अँटीबॉडीज टेस्ट करावी लागते. कोणताही आजार होऊन गेल्यावर काही रोगप्रतिकारक घटक तयार होतात त्यांना अँटीबॉडीज म्हणतात. आता भारतात करोना प्लाझ्मा थेरपीदेखील उपचाराचा एक भाग म्हणून दिली जाते. आता सविस्तरपणे प्रत्येक चाचणी संबंधी सविस्तर जाणून घेऊ या.

1. आरटी पीसीआर- स्वॅब टेस्ट
कोरोंना हा विषाणूंच्या गटातील आजार असून तो साध्या सूक्ष्मदर्शनाखाली दिसू शकत नाही. ही कोरोनाची खात्रीशीर टेस्ट असून ही जर पॉझीटिव्ह आली तर कोरोनाचा संसर्ग झाला आहे असे म्हणता येते. कोरोना विषाणूचा संसर्ग प्रथम घशाला होतो व रोगप्रतिकारक शक्ति कमी असल्यास त्याचा शिरकाव फुफ्फुसात होतो. लक्षणे दिसू लागल्यानंतर 8 दिवसाच्या आत ही टेस्ट करावी. 8 ते 10 दिवसांनंतर श्वासनलिकेतील किंवा थुंकीचा तपास करावा लागतो. ह्या टेस्टसाठी कापसाच्या बोळ्यावर घशातुन स्त्राव घेतला जातो व तो विशिष्ट अशा वायरल ट्रान्सपोर्ट द्रव्यात ठेऊन तपासणीसाठी पाठवला जातो. वायरल ट्रान्सपोर्ट पदार्थामुळे तो विषाणू जीवंत राहण्यास मदत होते. त्यानंतर प्रयोगशाळेत त्यातील रायबोन्यूकलेइक ऍसिड वेगळे करून विषाणूंची संख्या व क्षमता तपासली जाते. रिपोर्टसाठी साधारण 24 ते 48 तासचा कालावधी लागतो. जर रिपोर्ट  पॉझीटिव्ह असेल तर त्यावर लक्षणांनुसार योग्य ते उपचार करावे लागतात आणि काहीच लक्षणे जरी नसली तरीहीदेखील व्यक्तीचे विलगीकरण करावेच लागते. कारण त्या व्यक्तीद्वारे समाजात खूप मोठ्याप्रमाणावर संसर्ग होऊ शकतो. सर्व साधारण 80% ते 85% लोकांमध्ये ज्यांना आधीपासून कुठलीही व्याधी नाही असे रुग्ण 10 ते 12 दिवसात पूर्णतः बरे होतात व त्यांच्या शरिरात अँटिबॉडीज तयार होण्यास सुरवात होते.

रॅपिड अँटीजन टेस्ट
आरटी पीसीआरला लागणारा वेळ लक्षात घेता रॅपिड अँटीजनटेस्ट सुरू करण्यात आली आहे. नावाप्रमाणेच यांचे निदान रॅपिड म्हणजे अगदी 30 मिनीटात होते. समूह संसर्ग सुरू झाल्यावर जास्तीत जास्त लोकांची तपासणीकरून पॉझीटीव्ही रुग्णाचे विलगीकरण करून रोगाचा प्रसार आटोक्यात आणता येतो.  या टेस्टमध्ये नाकातील स्त्राव घेतला जातो व तपासला जातो. अँटीजन हा विषाणूचाच एक भाग असल्याने ही टेस्ट पॉझीटीव्ही आली तर कोरोनाने आपल्या शरीरात शिरकाव केला आहे हे समजते व रुग्णावर लवकर उपचार सुरू करता येतात. अँटीजन टेस्ट पॉझीटीव्ही आली तर आरटी पीसीआर टेस्ट करावी लागत नाही. मात्र रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं असूनदेखील टेस्ट जर निगेटिव्ह आली तर मात्र खात्रीसाठी आरटी पीसीआर टेस्ट करावी लागते.
वरील दोन्ही चाचण्यांमध्ये जर व्यक्तीची टेस्ट पॉझीटीव्ही आली तर एक निष्पन्न होते की शरीरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे व विषाणू सक्रिय असून इतरांना संसर्ग होऊ शकतो. म्हणून घाबरून न जाता  स्वतःहून विलगिकरण केल्यास कुटुंबातील इतर व्यक्तींना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही.

3. अँटिबॉडी टेस्ट
नैसर्गिकच रोगाचा प्रतिकार करण्याची देणगी मानवाकडे देखील आहे. कुठलाही विषाणूजन्य आजार होऊन गेल्यावर 2 ते 3 आठवड्यांनंतर रक्तात त्या आजाराच्या अँटिबॉडीज तयार होतात. अँटिबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारक घटक. ह्या अँटिबॉडीज शरीरात शिरकाव केलेल्या विषाणूवर हल्ला करतात व त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. शक्यतो अशा प्रकारे तयार झालेल्या अँटिबॉडीज ह्या बरेच वर्ष शरीरात राहतात व परत त्याच आजाराचा संसर्ग होण्यापासून बचाव करतात व त्याचा कोणताही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. आपण आतुरतेने वाट बघत असलेली लस देखील ह्याचप्रमाणे काम करणार आहे.
अँटिबॉडी टेस्ट जर पॉझीटीव्ही आली तर समजावे की रोगाचा प्रादुर्भाव होऊन गेला आहे आणि ती व्यक्ति आजारातून मुक्त झाली आहे. तसेच त्या व्यक्तीमुळे कोणालाही संसर्ग होऊ शकत नाही. थोडक्यात तुम्ही पूर्णतः सुरक्षित आहात व तुमच्यामुळे कोणालाही त्याची बाधा होणार नाही हे निश्चित होते. अशा व्यक्ति खरंतर प्लाझ्मा डोनर म्हणून योग्य असतात. प्लाझ्मा म्हणजे रक्तातील पिवळसर द्रव पदार्थ. कोरोनाबाधित रुग्ण आजारातून पूर्णतः मुक्त झाल्यावर त्याच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज ब्लडबँक मध्ये प्लाझ्माफेरेसिस च्या सहाय्याने वेगळ्या केल्या जातात. व आवश्यकतेनुसार त्यांचा वापर गंभीर रुग्णांवर केला जातो. अशाप्रकरे जर जास्तीत जास्त लोकांनी प्लाझ्मा डोनेट केले तर ब्लडबँकमध्ये  विशिष्ट तापमानात प्लाझ्मा साठवून ठेऊ शकतो व गरजेनुसार त्यांचा वापर रुग्णांवर करू शकतो.
सतर्क रहा व काटेकोरपणे नियमांचे पालन करा. आपल्या हलगर्जीपणामुळे अनेक कोरोना योद्धाना आपला जीव गमवावा लागत आहे ह्याचे भान ठेवा. योग्यवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या टेस्ट मनात संभ्रम आणि भीती  निर्माण करणार नाहीत व कोरोना लवकरात लवकर आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल.

डॉ. सई नेमाडे
एम. डी. पॅथॉलॉजीस्ट
ऑर्किड हॉस्पिटल
जळगाव


 

 

Previous Post

महाराणा शिक्षण मंचातर्फे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रा. उमेश पाटील यांना शिक्षक रत्न पुरस्कार

Next Post

सबका साथ, सबका विकास, और सब का विश्वासला मनपाचा ठेंगा .

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सबका साथ, सबका विकास, और सब का विश्वासला मनपाचा ठेंगा .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon