जळगाव ( प्रतिनिधी ) – वावडदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक ३ एप्रिलरोजी झाली रविंद्र कापडणे यांचे नम्रता पॅनल व सरपंच राजेश वाडेकर यांचे शेतकरीराजा विकास पॅनल यांच्यात लढत होती नम्रता पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले
या निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी आहेत – जनरल मतदार संघ अनिल भोळे (२४८), मिश्रीलाल राठोड (२४७), मोतिलाल पाटील (२४६), पोपट पाटील (२४२), सुधाकर येवले (२३८), संजय पाटील (२३५), देविदास वंजारी (२३१), हरी वंजारी (२२७), महिला राखीव मतदारसंघात दोन जागांवर सुमनबाई पवार (२४५), शशीकला पाटील (२३१) आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघात सुरेश पाटील (२४२), अनुसूचित जाती जमाती मतदार संघात अनिल गवळे (२२१) , वि.जा.भ.ज.व विमा.प्र. मतदारसंघातून पुरून वंजारी (२४४) हे नम्रता पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले
प्रतिस्पर्धी शेतकरीराजा विकास पॅनलचे सर्व उमेदवार पराभुत झाले जितेंद्र चव्हाण , मिठाराम गोपाळ , भाऊलाल जाधव , भानुदास पाटील , गंगाराम राठोड , मनोहर राठोड , संजय राजपूत (१२६), हरी वंजारी, कुसुमबाई पाटील , शांताबाई वंजारी , संजय पाटील, गोकुळ हडप, राजेश वाडेकर अशी या पराभूत उमेदवारांची नावे आहेत
नम्रता पॅनलने सर्व उमेदवार विजयी केल्याने चुरस बघायला मिळत नाही विजयी व पराभूत उमेदवारांचे मतातील फरक पाहता कुठेही काट्याची टक्कर पाहवयास मिळत नाही त्यामुळे हा विजय एकतर्फी आहे .