भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरातून पोलीसांनी तीन धारदार तलवारी जप्त करीत एका तरूणाला अटक केली या कारवाईने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.
गुलाम गौस कालू शहा (23, मुस्लिम कॉलनी, बाहेर मशिदी समोर, भुसावळ) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. मुस्लिम कॉलनी परिसरात संशयित गुलाम धारदार शस्त्र बाळगत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजार पेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. बुधवारी सकाळी कारवाईच्या सुचना दिल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील सपोनि शरीफोद्दीन काझी, पो.कॉ. जावेद हकीम शहा, सचिन पोळ, अक्षय चव्हाण , योगेश माळी आदींच्या पथकाने तरुणाच्या घरी छापा टाकला. या कारवाईत घरात तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आरोपी तरुणाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.