एमआयडीसी पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०४/२०२३ नुसार एमआयडीसी पो.स्टे., रामानंदनगर पोलीस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अश्लील शिवीगाळ करणे, घातक हत्याराने दुखापत, दमबाजी करणे या सदराखाली एकूण ०८ गंभीर गुन्हे तिघांवर दाखल आहेत. स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (वय १९ रा. डी. एन. सी. कॉलेजजवळ, शंकर अप्पानगर, जळगांव) (टोळी प्रमुख), निशांत प्रताप चौधरी (वय १९, रा. शंकर अप्पानगर जळगांव (टोळी सदस्य), कुणाल उर्फ दुंडया किरण कोळी (वय १९, रा साईसिटी, कुसूंबा ता. जळगांव) (टोळी सदस्य) असे या गुन्हेगारांचे नाव आहे. त्यापैकी पाच गुन्हे त्यांनी टोळीने केले. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी डीवायएसपी संदीप गावीत यांनी केलेली आहे.
या गुन्हेगारांनी टोळीने राहुन जळगाव शहरात ठिकठिकाणी भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास धोका निर्माण केलेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. याकरिता सदरचा हद्दपार प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे. चे पो.निरी. जयपाल हिरे, सफौ/अतुल वंजारी, पोना/सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, मपोकॉ/ निलोफर सय्यद यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.
एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे चौकशीअंती तिन्ही गुन्हेगारांना यांना ०२ वर्षा करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पो. निरी. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ / युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ/सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.