• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निधी खर्च होणार असेल तरच मागणी करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांनी त्यांना विविध कामांसाठी मंजूर केलेला निधी मार्च २०२१ पर्यंत खर्च होणार असेल तरच निधीची मागणी करावी. विहित वेळेत निधी खर्च न झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.


जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन भवनात पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, आदिवासी विकास विभाग, यावल प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देता येणार नसल्याने ज्या योजनांवर विहित कालावधीत खर्च होणार नाही त्या कामांचे प्रस्ताव रद्द करा. स्पीलमधील कामे पूर्ण होणार असतील तरच निधीची मागणी करा. जी कामे पूर्ण होणार नसतील त्याची यादी 10 नोव्हेंबरपूर्वी नियोजन विभागास कळवावी. जेणेकरुन सदरचा निधी इतर विकास कामांसाठी उपलबध करुन देता येईल.प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचे अतिरिक्त दायित्व निर्माण होणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. मंजूर निधीतून शिक्षण, आरोग्याच्या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर ज्या कामांची मुदत ठरलेली आहे त्यापूर्वी ती नादुरुस्त झाल्यास ती कंत्राटदारांकडूनच दुरुस्त करुन घ्यावी. त्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव आल्यास सबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


जिल्ह्याचा सर्वसाधारण वार्षिक योजनेचा आराखडा ३७५ कोटी रुपयांचा असून त्यापेकी १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी बीडीएसवर उपलब्ध झाला असून २६ कोटी ८३ लाख ६८ हजार रुपयांचा निधी यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोविडचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांना आतापर्यंत ४४ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून २० कोटी २० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. शिवाय आमदार निधीतूनही जिल्हा शल्य चिकित्सक यांना २ कोटी ६१ लाख जिल्हा आरोग्य अधिकारी यांना १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.
या बैठकीत विविध विभागांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, सध्या सुरु असलेली कामे, अपूर्ण कामे, सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर सर्व विभागांनी सन २०२१-२२ चा प्रारुप आराखडा तयार करतांना मुलभूत सुविधांची कामे सुचविण्याबाबत सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.


 

 

Previous Post

जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यास परवानगी

Next Post

लाच घेणाऱ्या सरकारी बाबूंची माहिती द्या – एसीबीच्या उपअधीक्षकांचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लाच घेणाऱ्या सरकारी बाबूंची माहिती द्या - एसीबीच्या उपअधीक्षकांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon