जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जुने बसस्थानकाजवळील जैन मंदीराच्या गल्लीत पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवार २६ ऑक्टोबर रोजी रात्री शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त अशी की, संजय शांतीलाल अलिझाड ( वय – 52) रा. गणेश कॉलनी, जळगाव हे व्यापारीचे काम करतात. शहरातील जुने बस स्टॅन्ड जवळील जैन मंदिराच्या गल्लीमध्ये त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ सीडी ४८९६) लावली होती. दरम्यान अज्ञात चोट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. बुधवार २६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.