• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जि.प. च्या लाचखोर अभियंत्यासह दोघांना सक्तमजुरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2020
in जळगाव
0

तत्कालीन सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्यासह चौघांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण

जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील भोरस बुद्रृक ते चाळीसगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर कामाचे मोजमाप करून बिले मंजुर करण्‍यासाठी संबंधित ठेकेदाराला जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता राजेंद्र गणपत मोरे यांनी वीस हजारांची रूपयांची लाचेची मागणी केली होती.या प्रकरणात लाच दुसऱ्‍या इसमाच्या माध्यमातून स्वीकारल्याच्या प्रकरणात शुक्रवारी दि. २५ रोजी न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी अभियंत्यासह दोघा आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. त्यात लाचेची मागणी करणाऱ्या आरोपी जिल्हा परिषद अभियंताला ४ वर्षाची तर लाच स्विकारणाऱ्यास तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात तत्कालीन जि. प. सीईओ आस्तिककुमार पांडेय व पोलीस उपअधीक्षक डी. डी. गवारे यांच्यासह चौघांची साक्ष महत्पूर्ण ठरली.

अभियंता राजेंद्र गणपत मोरे (५४, रा. चाळीसगाव) आणि शेषराव ऊर्फ भोला अहिरराव (५३, खेडी खुर्द, ता.चाळीसगाव) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील सुनील पाटील हे खाजगी ठेकेदाराचा व्यवसाय करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात. सन २०१५ मध्‍ये त्यांनी भोरस बुद्रृक ते चाळीसगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम केले होते. त्यावेळी रस्त्याचे कामाचे मोजमाप करून बिल मंजुर करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील चाळीसगाव उपविभागीय कार्यालयामधील शाखा अभियंता राजेंद्र मोरे यांच्याकडे होते. मात्र, सहा महिन्यांपासून ते टाळाटाळ करीत होते. सुनील पाटील यांच्या कामकाजाचे मोजमाप करून बिले मंजुर करण्‍यासाठी २१ जानेवारी २०१५ रोजी शाखा अभियंता मोरे यांनी २० हजार रूपये लाचेची मागणी केली. रक्कम मोरे यांनी खाजगी इसम शेषराव अहिरराव याच्या मार्फत स्वीकारली व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले होते.

तपास पूर्ण केल्यानंतर तपासी अधिकारी डी.डी.गवारे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर हा खटला न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात चालला. यावेळी सरकारपक्षातर्फे मोहन देशपांडे यांनी चार साक्षीदार तपासले. त्यात तक्रारदार सुनील पाटील, दिगंबर पाटील, तत्कालीन जि.प.सीईओ आस्तिककुमार पांडेय व तपास अधिकारी डी.डी.गवारे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

या लाच प्रकरणामध्ये न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी निकाल दिला. त्यात अभियंत्या राजेंद्र मोरेसह त्याच्या खाजगी इसम शेषराव अहिरराव यांना दोषी ठरविण्‍यात आले आहे. त्यात खाजगी इसम शेषराव अहिरराव याला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १२ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच लाचेची मागणी करणाऱ्‍या राजेंद्र गणपत मोरे यास लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपयांचा दंड आणि कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३ (१)(ड) व १३ (२) नुसार चार वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाचे आदेश केले असून दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे ॲड.मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.


 

 

Previous Post

विराज कावडीया यांना त्रिमूर्ती कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार

Next Post

धनाजी काळे नगरात घरफोडीतील चोरट्यांना मुद्देमालासह अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धनाजी काळे नगरात घरफोडीतील चोरट्यांना मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon