पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील निंभोरी बुद्रुक येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास विकास परमेश्वर शेळके यांच्या कृणाल किराणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने कटरने तोडून दुकानातील प्रिंटर, तीन तेलाचे डबे, तिन पिशव्या, चार्जरसह विविध किराणा माल चोरुन अज्ञात चोरटे फरार झाले आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला चोरीची गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील मोंढाळे ते वाणेगाव मेन रोड लगत असलेल्या निभोंरी बुद्रुक गावातील कृणाल किराणा दुकान दुकान मालक विकास परमेश्वर शेळके हे मंगळवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. विकास शेळके हे नित्यनियमाप्रमाणे आज २३ रोजी बुधवारी सकाळी ६.४५ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदरचा प्रकार निदर्शनास आला. अज्ञात चोरट्याने कटरने दुकानाचे शटर तोडून विविध वस्तू व किराणा मालाची चोरी करून ड्रावरमधील रोख २ हजार ५०० रुपये चोरी करून फरार झाले. शेळके यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

