रत्नागिरी (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील सर्वात मोठी केमिकल कंपनी म्हणून खेड तालुक्यातील घरडा केमिकल कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीत विविध प्रकारची केमिकल तयार होतात. आज सकाळी कंपनीमध्ये प्लांट 7 बी मध्ये दोन स्फोट झाले. या स्फोटाच्या आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की बचाव कार्याला आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आज सकाळी नेहमीप्रमाणे या प्लांटमध्ये 40 ते 50 कामगार गेले असता कामगाराच्या टी टाइम नंतर स्फोट झाला. त्यामुळे काही कामगार अडकले होते. आतमध्ये झालेल्या स्फोटामुळे आतील कामगारांना आगीच्या ज्वाळा बसल्या त्यामध्ये कंपनीच्या बचाव पथकाने पाच जणांना बाहेर काढले. त्यांना अधिक उपचारासाठी खेड मधील उपजिल्हा रुग्णालयमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान चौघाचा मृत्यू तर एकाची परिस्थिती गंभीर आहे. काही कामगार आतमध्ये अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. लागोपाठ झालेल्या दोन स्फोटामुळे खेड एमआयडीसी हादरली असून स्थानिक रहिवासी भयभीत झालेत.







