जळगाव (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ललित विजयराव नारखेडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे पक्षातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
ललित नारखेडे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी यांनी दिले आहे. ही निवड पक्ष अध्यक्ष शरद पवार, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख तसेच जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते ललित नारखेडे यांना देण्यात आले.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, माजी नगरसेवक सुनील माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.