• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फेकरी शिवारातील प्लॉटची बनावट शिक्के व स्वाक्षरीसह विक्री : गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील फेकरी शिवारातील प्लॉटची तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी तसेच त्यांच्या पदाचे बनावट शिक्के वापरून सहकारी पतपेढीच्या विशेष वसुली अधिकार्‍याने १० प्लॉटची विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील श्री जनकल्याण अर्बन क्रेडिट पतसंस्थेच्या विशेष वसुली अधिकारीपदी रवींद्र धांडे हे कार्यरत आहेत. त्याने पतसंस्थेच्या मालकीच्या फेकरी शिवारातील सर्व्हे नंबर ३/४ मधील प्लॉट १, ४, ५ व ६ बिन शेती खुले बखळ प्लॉट, जागा, स्थावर मिळकत जमिनीच्या सातबारा उतार्‍याचे विभाजन न करता, तुकडा न पाडताच विभाजन करून परस्पर विक्री केली. यासाठी रवींद्र धांडेने तहसीलदारांचा बनावट आदेश व तहसील कार्यालयातील शिक्का तयार करून त्या आदेशाच्या २२ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशाचे पत्र तयार केले. त्याआधारे १० जणांना प्लॉटची विक्री केली.

यानंतर या खरेदी-विक्रीची नोंद सहायक निबंधक खरेदी विक्री कार्यालयात १६ मे २०२२ रोजी करण्यात आली. भुसावळचे तहसीलदार धिवरे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. यातून हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. या संदर्भात नायब तहसीलदार शोभा घुले यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात बनावट स्वाक्षरी आणि शिक्के तयार करून प्लॉट विक्री करणारा रवींद्र गोपाळ धांडे (रा. तुळशीनगर, भुसावळ) याच्यासह प्लॉट घेणारे मनीषा कैलास कोळी (रा.फेकरी), राजेंद्र अमृत तायडे (रा.बजरंग कॉलनी, गांधीनगर, भुसावळ), उमेश विकास बर्‍हाटे (रा.जुना वरणगाव रोड, फेकरी), दीपाली अनिल सोनवणे (रा.खडका रोड, नेमाडे कॉलनी, भुसावळ), प्रशांत बळीराम पाटील (रा. जगदंबनगर, वरणगाव), किरण भीमराव तायडे (रा.आंबेडकर नगर, वरणगाव), अक्षय प्रमोद जैस्वाल (रा.बामणोद, ता.यावल), कैलास सुधाकर पाटील (रा.निंभोरा बुद्रूक, भुसवळ), पुष्पा राजेंद्र मसराम, राजेंद्र रामचंद्र मसराम (रा.फेकरी, भुसावळ) या सर्वांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट हे करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

वाघोदा येथे एकाला मारहाण ; सावदा पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ललित नारखेडे यांची राष्ट्रवादी युवक महानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ललित नारखेडे यांची राष्ट्रवादी युवक महानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon