• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करणं काय राजकारण आहे माहिती नाही – नवाब मलिकांची फडणिसांवर टीका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2021
in महाराष्ट्र
0


मुंबई (वृत्तसंस्था) – ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या चौकशीवर आक्षेप घेणाऱ्या भाजप नेत्यांची भूमिका ती औषधी खरेदी करून बाजारात विकण्याची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या सीओडींनी फोन केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
“देशामध्ये सात कंपन्यांना देशांतर्गंत वाटप आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे. दोन कंपन्यांना पदरेशात विक्रीची परवानगी आहे. त्याउलट १७ कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध असून राज्य सरकारकडे विक्रीची परवानगी मागत आहेत. ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न न औषध मंत्री शिंगणे आणि प्रवीण दरेकर यांना भेटले. माझ्याकडे साठा आहे, परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो अशी माहिती दिली. पोलिसांना निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती,” असं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वजण रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.

“पोलीस यंत्रणा काळा बाजार रोखण्यासाठी, जनतेसाठी काम करत आहे. पण डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजपा का घाबरते? सगळा भाजपा वकिलीसाठी का जात आहे? फडणवीस वकील आहेत.ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की त्यांचे संबंध आहेत म्हणून मांडत होते? महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी बोलावलं असेल तर भाजपाचे प्रमुख नेते तिकडे जातात यावरुन काय संबंध आहेत हा खुलासा केला पाहिजे,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

“ट्विट करुन ५० हजारांचा साठा आम्ही वाटणार आहे सांगता. पण सरकार मागतं तेव्हा ते लोक देत नाही, मग त्यांच्या मागे काय राजकारण आहे हे भाजपाने स्पष्ट केलं पाहिजे. ज्यांनी साठा ठेवला त्यांना चौकशीसाठी बोलावलं आणि नंतर भाजपा नेते वकिलीसाठी पोलीस ठाण्यात जातात हे योग्य नाही.हे त्यांना शोभत नाही. विरोधी पक्षनेता फोनवरुन माहिती घेऊ शकतो, वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करणं काय राजकारण आहे माहिती नाही,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.


 

 

Previous Post

भुसावळ शहरातील मालती संज्योत कोविड सेंटर रुग्णांसाठी ठरत आहे “देवदूत”

Next Post

यावल तालुक्यातील महेलखेडी येथे देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल तालुक्यातील महेलखेडी येथे देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्डाची केली अदलाबदली : भामट्याने ५६ हजार रुपये लांबवले
1xbet russia

एटीएममध्ये कार्डची अदलाबदल; भुसावळच्या व्यक्तीची ८० हजारांची फसवणूक

July 11, 2026
हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता
1xbet russia

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

July 11, 2026
चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर
1xbet russia

चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

July 11, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा
Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्डाची केली अदलाबदली : भामट्याने ५६ हजार रुपये लांबवले

एटीएममध्ये कार्डची अदलाबदल; भुसावळच्या व्यक्तीची ८० हजारांची फसवणूक

July 11, 2026
हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon