पारोळा -[ प्रतिनिधी ] येथील राज्य पुरस्कार प्राप्त निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना चाळीसगांव येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन तर्फे राज्य स्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार २०२० जाहीर झाल्याने आदर्श व्यक्तिमत्वाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे . भावसार सरांना यापूर्वी १० राज्य स्तरीय व ६ जिल्हा / विभाग स्तरीय असे एकुण १६ पुरस्कार मिळाले असून हा १७ वा पुरस्कार आहे.
स.ध. भावसार सर निवृत्तीनंतरही गेल्या १५ वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून नि:स्वार्थी वृत्तीने व निरपेक्ष भावनेने समाजोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबवत आहेत . कोरोना बाधितांसाठीचे त्यांचे फार मोठं योगदान असून राज्यभरातून कोरोना योद्धा म्हणून तब्बल १९ सन्मानपत्रे त्यांना मिळाली आहेत. यामुळेच गुणग्राहक संस्थेने त्यांची दखल घेऊन पुरस्कार जाहीर केला .
सदर पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावसार सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.