जळगाव ( प्रतिनिधी ) – शाहूनगर परिसरात असलेल्या इंदिरानगरात भांडण सोडवण्याच्या कारणावरून एका महिलेला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत शहर पोलीस स्टेशनला गुरुवारी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, चांदणी डायमंड बिहारी (वय-३५) रा. फिरोज पान सेंटर, जळगाव या महिलेचे त्याच भागातील यास्मिनबी यांच्याशी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता भांडण सुरू होते. याच दरम्यान साजिदा सत्तार भिस्ती (वय-४०) रा. इंदिरानगर, फिरोज पान सेंटरजवळ, जळगाव ह्या महिला दोघांचे सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेल्या. याचा राग आल्याने चांदणी डायमंड बिहारी हिने शिवीगाळ करून हातातील फरशी उचलून साजदा भिस्ती यांच्या डोक्यावर मारून जखमी केले. याप्रकरणी साजदा भिस्ती यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता चांदणी डायमंड बिहारी (वय-३५) रा. फिरोज पान सेंटर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.