• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मग मी मंत्रालयात कसा येऊ? – रामदास आठवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्य सरकारनं आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात ड्रेसकोड लागू केला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावे याबाबत सरकारनं काही निर्देश आखून दिले आहेत. त्यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला एक मिश्किल प्रश्न केलाय. मग मी मंत्रालयात कसा येऊ? असं रामदास आठवले यांनी विचारलं आहे.

राज्यसरकार ने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?, असं ट्वीट रामदास आठवले यांनी केलं आहे.

दरम्यान, सरकारनं दिलेले निर्देश हे केवळ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्यामुळे मंत्री किंवा नेतेमंडळींचा संबंध नाही. पण रामदास आठवले यांनी आपला एक रंगीबेरंगी कपड्यातला फोटो ट्वीट करुन राज्य सरकारच्या या निर्णयावर मिश्किलपणे टीका केली आहे.

रामदास आठवले यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले आहेत. त्यात राज्यपालांना भेटा, सरळ राजीनामा देऊन टाका, अशा सल्ल्यांचाही समावेश आहे. तर काहींनी त्यांना तुम्ही राज्यात नाही केंद्रात आहात, अशी आठवणही करुन दिली आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना भडक रंगाचे, रंगीबेरंगी कपडे घालता येणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्टही घालता येणार नाही. महिला कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा अशाच प्रकारचे कपडे घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असंही नव्या नियमांत सांगण्यात आलं आहे.


 

 

Previous Post

आंदोलनात शेतकरी नसेल तर त्यांच्याशी चर्चा का करता ? – पी चिदंबरम

Next Post

या कायद्याबाबत अफवा पसरवल्याने हा विलंब – नरेंद्रसिंह तोमर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या कायद्याबाबत अफवा पसरवल्याने हा विलंब - नरेंद्रसिंह तोमर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon