• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

२६ ऑगस्टला भव्य कार्यक्रम; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

जळगाव | प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या जागेतील स्थलांतर सोहळा बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. जळगाव शहरातील प्रतापनगर, गणेश कॉलनी रोडवरील राजेश्री शाहू कॉम्प्लेक्ससमोरील ‘बुलडाणा अर्बन भवन’ येथे या नव्या शाखेचे उद्घाटन होणार आहे.

या सोहळ्यास बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी), संस्थापक अध्यक्ष सुभाषजी तोतला, अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर तसेच बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

उद्घाटनानंतर कानळदा रोडवरील के.सी. पार्कसमोरील समर्थ लॉन्स येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात ३२ शाखांचे जाळे

बुलडाणा अर्बनने जळगाव जिल्ह्यात आपल्या सेवांचा विस्तार केला असून जिल्ह्यात एकूण ३२ शाखा असल्याची माहिती संस्थेच्या निमंत्रणपत्रिकेत देण्यात आली आहे. जळगाव, भुसावळ, वरणगाव, रावेर, फत्तेपूर, जामनेर, पाचोरा, नगरदेवळा, चोपडा, गोलाणी मार्केट, चाळीसगाव आणि धरणगाव यांसह विविध ठिकाणी संस्थेची शाखा कार्यालये कार्यरत आहेत.

जिल्ह्यात संस्थेची ७ स्वमालकीची गोदामे असून त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४ लाख ५० हजार पोत्यांची आहे. तसेच जळगाव व भुसावळ येथे २ स्वमालकीची शीतगृहे असून त्यांची क्षमता सुमारे १ लाख ५० हजार पोत्यांची असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

५११ कोटींच्या ठेवी; ४५८ कोटींचे कर्ज

जळगाव जिल्ह्यात संस्थेच्या एकूण ५११ कोटी रुपयांच्या ठेवी असून सुमारे ४५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये सोनेतारण कर्जाचा मोठा वाटा असून वेअरहाऊस तारण कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.

शेतकरी व व्यापाऱ्यांना धान्य साठवणुकीसाठी वेअरहाऊसच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

४८२ शाखा, ४६२ गोदामांचे व्यापक जाळे

बुलडाणा अर्बनच्या एकूण संस्थात्मक विस्तारात ४८२ शाखा आणि ४६२ गोदामे असल्याचे निमंत्रणपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या एकूण ठेवी १६,१७७ कोटी रुपये, एकूण कर्ज ११,७९५ कोटी रुपये, सभासद संख्या १६ लाख ५ हजार ८४१, सोनेतारण कर्ज ५,६७२ कोटी रुपये आणि वेअरहाऊस तारण कर्ज ४४० कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आर्थिक व्यवहारांसोबत सामाजिक बांधिलकी

बुलडाणा अर्बनकडून आर्थिक व्यवहारांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. तिरुपती बालाजी, माहूरगड, शिर्डी, तुळजापूर, अयोध्या आणि पंढरपूर येथे भक्तनिवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरात सीबीएसई पॅटर्न निवासी शाळेसह संस्थेच्या विविध ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

याशिवाय सभासदांच्या पाल्यांसाठी पुणे व बुलडाणा येथे वसतिगृह सुविधा, बुलडाणा व मोर्शी येथे गो-रक्षण धाम, बुलडाणा येथे वेद विद्यालय, महामार्गांवर रुग्णवाहिका सेवा तसेच स्वर्गरथ सेवा अशा विविध सामाजिक उपक्रमांचा संस्थेच्या कार्यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विविध कर्ज सुविधा

सोनेतारण कर्ज, वेअरहाऊस पावती तारण कर्ज, एलआयसी तारण कर्ज तसेच लॉकर सुविधा यांसारख्या विविध सेवा संस्थेच्या शाखांमधून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वेअरहाऊस सुविधेमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध प्रकारचे धान्य व कृषीमाल सुरक्षितपणे साठवता येत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

“केवळ अर्थ व्यवहारच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीसुद्धा” या भावनेतून बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेच्या नव्या स्वमालकीच्या वास्तूत होणाऱ्या स्थलांतर सोहळ्यास नागरिक, सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बुलडाणा अर्बन परिवारातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

Next Post

मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात

मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी अमळनेरात पतीविरोधात गुन्हा दाखल

August 22, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

वाळू टाकण्याच्या वादातून दुकानमालकासह तिघांवर जीवघेणा हल्ला

August 22, 2026
मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात
1xbet russia

मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात

August 22, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
Uncategorized

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी अमळनेरात पतीविरोधात गुन्हा दाखल

August 22, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

वाळू टाकण्याच्या वादातून दुकानमालकासह तिघांवर जीवघेणा हल्ला

August 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon