• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2026
in महाराष्ट्र
0
सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्याने थरारक दुर्घटना; चालक गंभीर जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

सिन्नर (नाशिक) | प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी बायपासवर रविवारी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. भरधाव वेगाने धावणारा ट्रक अचानक चालकाचा ताबा सुटल्याने फ्लायओव्हरचा सुरक्षा कठडा तोडत सुमारे ५० फूट खाली कोसळला. या थरारक अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/p92cFzzj159trn1N.mp4

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ जुलै रोजी सिन्नर एमआयडीसी बायपास परिसरात हा अपघात घडला. फ्लायओव्हरवरून जात असताना ट्रक अचानक अनियंत्रित झाला. काही क्षणांतच ट्रकने रस्त्यावरील सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिली आणि कठडा तोडत थेट खालील रस्त्यावर कोसळला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रक भरधाव वेगाने जाताना दिसतो. त्यानंतर तो अचानक नियंत्रणाबाहेर जात फ्लायओव्हरवरून खाली पडताना स्पष्ट दिसत आहे. काही सेकंदांत घडलेला हा प्रकार पाहून घटनास्थळावरील नागरिकही हादरले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सुमारे ५० फूट उंचीवरून खाली कोसळल्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, अतिवेग किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून वाहनाची तांत्रिक तपासणी, चालकाची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Previous Post

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Next Post

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट
1xbet russia

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला
महाराष्ट्र

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
क्राईम

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!