मुंबई (वृत्तसंस्था) – सोशल मीडिया मधील सर्वात अधिक वापरलेजाणारे आणि अल्पवधीत लोकप्रिय झालेले अॅप म्हणजेच व्हॉट्सअॅप. मेसेज पाठवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या व्हॉट्सअॅपकडून सातत्याने नवनवीन अपडेट मिळत असतात. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपने काही नवीन फिचर जारी करणार आहेत. या नवीन फीचरमुळे इंटरनेट बंद ठेवूनही व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनचा तुम्ही वापर करू शकाल.
यापूर्वी डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा उपयोग करतांना तुम्हाला मोबाइल वरून QR कोड स्कॅन करावा लागायचा मात्र आता ते करण्याची गरज पडणार नाही. कंपनी WhatsApp Web साठी अॅक्टिव मोबाइल कनेक्शनचे बंधन काढून टाकणार आहे. ज्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप सुरू राहिल त्यात इंटरनेटची गरज असेल. सध्या कंपनी या फीचरची टेस्टिंग करीत आहे. लवकरच युजर्संसाठी हे जारी केले जाईल.
HackRead मध्ये देण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या वेब वर्जनमध्ये आता युजर्सला QR कोड स्कॅन करण्याची गरज लागणार नाही. कंपनी व्हॉट्सअॅप वेब वर्जनसाठी अॅक्टिव्ह मोबाईल इंटरनेट कनेक्शनची अनिवार्यता संपवण्याच्या दृष्टीने काम करत आहे.
ज्या डेस्कटॉपवर युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत, त्यावर इंटरनेट असणं अनिवार्य आहे. व्हॉट्सअॅप सध्या या फीचरच टेस्टिंग करत आहे. लवकरच हे फीचर युजर्ससाठी लाँच केलं जाण्याची शक्यता आहे.
जाणून घेऊया या फीचरबाबत
-Whatsapp च्या Multi-Device Feature चा एक भाग आहे.
-मल्टी डिव्हाइस फीचरद्वारे युजर्स एकाच अकाउंटवरून चार डिव्हाइसचा वापर करू शकतील.
-याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मेन डिव्हाइससाठी इंटरनेट कनेक्शनची गरज नाही. या फीचरची टेस्टिंग केली जात आहे.