• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील कोविड १९ साठी तब्बल ६१ कोटी खर्च करता येणार – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील जिल्हा नियोजन समितीला कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ३३ टक्के निधीतील ५० टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याची नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या मागणीला मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राज्यातील कोविड १९ चा प्रतिकार करण्यासाठी रुग्णांना लाभ होणार असून जिल्ह्यातील कोविड १९ साठी तब्बल ६१ कोटी खर्च करता येणार असल्याने कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांना वाढीव निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या संदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १४ एप्रिल २०२० रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२०-२१ च्या अंतर्गत उपलब्ध होणार्‍या ३३ टक्के तरतूदी पैकी २५ टक्के निधी हा कोविड-१९ विषाणूवरील उपाययोजना आणि सार्वजनीक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधा बळकट करण्यासाठी राखीव करण्यात आला होता. २९ मे २०२० रोजीच्या पत्रकान्वये याला खर्च करण्याची मंजुरी देखील देण्यात आली होती.

दरम्यान, कोरोनाचा प्रकोप वाढत असल्यामुळे ३३ टक्क्यांमधील २५ टक्के रक्कम ही अपूर्ण पडत असल्याने राज्य शासनाने ही मर्यादा वाढवावी अशी मागणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली होती. या मागणीला राज्य मंत्रीमंडळाच्या नुकत्याच ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२०-२१च्या अंतर्गत उपलब्ध होणार्‍या ३३ टक्के तरतूदी पैकी ५० टक्के निधी हा कोविड-१९ विषाणूवरील उपाययोजना आणि सार्वजनीक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधा बळकट करण्यासाठी वापरण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यातील वाढलेल्या कोविड-१९ विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जिल्हा नियोजन समितीला आरोग्य विषयक सुविधांसाठी अतिरिक्त निधी खर्च करण्याची मंजुरी मिळाल्याची बाब ही लक्षणीय असून याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. अर्थात यासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी केलेली मागणी कारणीभूत ठरली आहे.

दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या या शासन निर्णयाचा राज्यासह जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी उपयोग होणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठीचा अर्थसंकल्पीत तरतूद ३७५ कोटीच्या ३३% म्हणजे १२३ कोटी ७४ लक्ष ९९ हजार निधी उपलब्ध होणार असून त्याच्या ५० % म्हणजे ६१ कोटी ८८ लक्ष निधी कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता खर्च करता येणार आहे.


 

 

Previous Post

नांदगाव येथे सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यू

Next Post

भाजपने मुंबईच्या महापौरांविरोधात दाखल केला अविश्वास प्रस्ताव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजपने मुंबईच्या महापौरांविरोधात दाखल केला अविश्वास प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत
जैन कंपनी

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon