• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात आठवड्याभरात दोन खून झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे आणि शहर पोलीसांनी संवेदनशिल भागात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

शहरातील संवेदनशिल भाग असलेला तांबापूर, जाखानी नगर, सिंगापूर, कंजरवाडा, तुकारामवाडी या परिसरात कोंम्बिग करून गुन्हेगारांची तपासणी केली. सोमवारी रात्री उशीरा तांबापूरा परिसरातून कोम्बिंगला सुरुवात करण्यात आली. या भागातील गुन्हेगारांची कसून झाडाझडती घेण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात गुन्हेगारीचा कळस गाठला आहे. कोरकोळ कारणावरून चॉपर व कोयता हल्ला करून दोन जणांचा खून करण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रात्री उशीरा घडल्या. येत्या दिवाळी शांततेत पार पाडण्याबरोबरच पोलीसांचा वचक असला पाहिजे म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री १२ ते पहाटे ४ वाजे दरम्यान तांबापूरापासून गुन्हेगारींची झाडाझडती करण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सपोनि गणेश काळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, हेमंत कळसकर, सुधिर साळवे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी, होमगार्डचे पथक यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खून झाल्यानंतर शहर पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी गेंदालाल मिल, राजमालती नगर, शिवाजी नगर, शिवाजी नगर हुडको, शाहु नगर परिसरातील असलेले गुन्हेगार यांच्या घराची झाडाझडती घेतली. यात २५ अट्टल गुन्हेगारांचा समावेश होता. यापैकी १० जण आढळून आले तर काही गावाला वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेरगावी गेले असल्याचे सांगण्यात आले. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, पो.कॉ. तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गिते, भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर, राजकुमार चौबे, ओमप्रकाश पंचलिंग यांच्यासह आरसीपी प्लाटून यांनी मध्यरात्री कारवाई केली.


 

 

Previous Post

मनपाच्या उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचा अर्ज दाखल

Next Post

लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon