• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापौरांनी केली मद्यपीची कानउघडणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू, गुटखा न दिल्यास आत्महत्येची धमकी देणाऱ्याला महापौर सौ.भारती सोनवणे यांनी चांगलाच दम दिला. मद्यपीकडून दारूच्या ४ बाटल्या, गुटखा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मद्यपीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत असून महापौर सौ.भारती सोनवणे रुग्णांची विचारपूस करीत असतात. बुधवारी अविनाश पाटील नामक एक मद्यपी गोंधळ घालत असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांना मिळताच त्या तात्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विजय घोलप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मनपाच्या कोविड केअर सेंटर इमारत क्रमांक ४ मध्ये आईसह उपचारार्थ दाखल असलेल्या अविनाश पाटील या तरुणाने बाहेरून दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. तसेच मला दारू आणि गुटखा न दिल्यास मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी तो देत होता. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्याला खाली बोलवत चांगलीच कानउघडणी केली. तसेच त्याच्या ताब्यातील ४ दारूच्या बाटल्या आणि गुटखा देखील काढून घेतला.

महापौर सौ.भारती सोनवणे या मद्यपीला खडसावत असतानाही त्याने मद्यप्राशन केलेले होते. महापौरांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्याने टेबलावर ठेवलेली गुटख्याची पुडी उचलून वर पळ काढला आणि स्वतःच्या खोलीत जात आतून कडी लावून घेतली. मद्यपी इतक्यावरच थांबला नाही तर खोलीतून तो पुन्हा पुन्हा आत्महत्येची धमकी देत होता.

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या अविनाश अरुण पाटील याच्यासह कोविड केअर सेंटरच्या बाहेर जाऊन परत येणाऱ्या गजानन विजय काकडे, प्रसन्न प्रदीप सराफ यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात डॉ.विजय घोलप यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिले आहे.


 

 

Previous Post

पाचोरा – भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Next Post

ब्रिटनच्या संसदेतील ‘या’ चर्चेबाबत भारताचा तीव्र आक्षेप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ब्रिटनच्या संसदेतील 'या' चर्चेबाबत भारताचा तीव्र आक्षेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon