नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गुणवत्तेशी तडजोड न करता नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून रस्ते बांधणीत स्टील व सिमेंटचा वापर कमी केला पाहिजे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
रस्ते विकास या परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलचा उपयोग रस्ते उपकरणाच्या यंत्रणेसाठी करावा. आयातीवर निर्बंध लादणे, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी पद्धती आणि पर्यायी इंधन विकासावर त्यांनी भर दिला.
सुमारे 63 लाख किलोमीटर रस्त्याचे जाळे असणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. रस्ते पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.