अमळनेर( प्रतिनिधी ) – पीक कर्जाची रक्कम बँकेतून काढून घरी जात असलेल्या वृद्धाच्या कापडी पिशवीतून ५० हजार रुपयाची रक्कम चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिताराम शंकर धनगर ( वय – ७५ ) रा.हिंगोणा, ता.अमळनेर हे शेतकरी असून आपला कुटुंबीयांसह राहायला आहे. सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी खात्यावर पीक कर्जाची अनुदान शासनाकडून मिळाले, मिळालेल्या अनुदानाची रक्कम काढण्यासाठी ते बँकेत गेले. बँकेतून पैसे काढून पुन्हा अमळनेर बसस्थानकात आले. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कापडी पिशवीत ठेवलेले ५० हजार रुपयांची रक्कम चोरली. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर सिताराम धनगर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक सुनील महाजन करीत आहे.