• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोलापूरमधील १६ पोलीस कोरोनाबाधित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

सोलापूर : एकमेकांच्या संपर्कातून सोलापूर जिल्ह्यातील १६ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून आणखी किमान शंभर पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोरोनाची लागण झालेले हे १३ पोलीस कर्मचारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील आहेत, तर तीन पोलीस कर्मचारी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील आहेत. यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन तथा कर्फ्यू लागू झाल्यानंतर देशासह राज्यातील पोलीस २३ मार्चपासून रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देत आहेत. यापैकी काही पोलीस तर कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठेत १२ एप्रिल रोजी कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्यापाठोपाठ रुग्णांची संख्या उत्तरोत्तर वाढत चालली आहे. शनिवारपर्यंत २८ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत १५६ वर जाऊ न पोहोचली आहे. यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त भाग बहुतांश दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टय़ांशी संबंधित आहे.

सोलापुरात एकमेकांच्या संपर्कामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असताना सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गेल्या आठवडय़ात कोरोनाबाधा झाल्याचे दिसून आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात हलवून त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली असता त्यापैकी आणखी दोन पोलिसांना कोरोनाबाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा नऊ पोलिसांना कोरोनाने ग्रासल्याचे आढळून आले. तर दुसरीकडे सोलापूर शहरातील तीन पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली असून यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या संपर्कातील शंभरपेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात येत असून त्याचे निष्कर्ष अद्यापि समोर आले नाहीत. एकंदरीत पोलिसांना कोरोनाचा विळखा पडू लागल्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.


 

 

Previous Post

साताऱ्यातील ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Next Post

काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती- संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती- संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon