रावेर ;- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुरलीधर तायडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपचेमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुरलीधर तायडे यांनी आज अधिकृत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. रावेर प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौर्या निमित्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आज तायडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, पं स. सदस्य दिपक पाटील युवक अध्यक्ष सचिन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीला मुरलीधर तायडे उपस्थित होते. त्यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तायडे यांच्या प्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे मानले जात आहे.








