जळगाव (प्रतिनिधी) – दरवर्षी जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध विभांगामध्ये क्रीकेट सामन्यांच्या टुर्नामेंटच आयोजन करण्यात येत असत. त्यानुसार 2022 या वर्षाच्या क्रीकेट टुर्नामेंटचे सामने जीएस ग्राऊंड जळगाव येथे खेळवण्यात येत आहेत.
त्यात जि.प.सार्वजनिक आरोग्य विभागाने कर्णधार डॉ.अभिषेक ठाकुर व उपकर्णधार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात आपले खेळाडु मैदानात उतरवले आहेत.
शनिवार दि.12 फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाचा पहीला सामना जि.प.बांधकाम विभाग यांच्या विरुद्ध खेळवण्यात आला.सदरील सामन्यात आरोग्य विभागाने प्रथम फलंदाजी करत 7 षटकांमध्ये 97 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर फलंदाजी करायला मैदानात आलेल्या बांधकाम विभागाला आरोग्य विभागाने भेदक गोलंदाजी करुन 5 षटक संपण्यापुर्वीच अवघ्या 42 धावांमध्येच बांधकाम विभागाचे सर्व गडी बाद केले व आरोग्य विभागाने तब्बल 57 धावांनी विजय मिळवला.
त्यानंतर दुपारच्या सत्रात आरोग्य विभागाचा दुसरा सामना पंचायत समिती धरणगाव यांच्या विरोधात खेळवण्यात आला. आणि दुसऱ्या सामन्यात देखील आरोग्य विभागाने प्रथम फलंदाजी करत 7 ओव्हर मध्ये 123 धावांचा डोंगर उभारला., त्यात डॉ.गुड्डु यांनी व्यक्तिगत 66 धावा करत विषाल चौधरी यांच्या सोबत शतकीय भागीदारी करुन संघाला मजबुत स्थिती प्राप्त करुन दिली. त्यानंतर फलंदाजी करण्याकरीता मैदानात आलेल्या पंचायत समिती धरणगाव च्या संघाला आरोग्य विभागाच्या संघाने अवघ्या 71 धावांवर रोखले व तब्बल 52 धावांनी विजय मिळवला.
दोघही सामन्यांमध्ये डॉ.गुड्डु यांनी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीमुळे त्यांना दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीर चे पुरस्कार देण्यात आले. त्यासोबतच विषाल चौधरी, डॉ.आलिम शेख, तेजकीरण राजपुत, प्रमोद रगरे यांनी आपल्या तुफान फटकेबाजीने प्रेक्षकांचे मन जिंकले.
आजच्या सामन्यांचे खेळ पाहिल्यानंतर जिल्हा परिषद जळगाव क्रिकेट टुर्नामेंट 2022 मध्ये आरोग्य विभागाच पारड चांगलच भारी असल्याच दिसुन आल.
आरोग्य विभागाचा संघ-
डॉ.अभिषेक ठाकुर (कर्णधार),अजय चौधरी (उपकर्णधार) ,प्रमोद रगरे , सुनिल ढाके , विषाल चौधरी ,तेजकीरण राजपुत, सौरव पवार ,डॉ.गुड्डु , डॉ.अलिमुद्दीन शेख , डॉ.रमीझ सय्यद , डॉ.इलुमुद्दिन आलम शेख , सुनिल विसपुते ,अजित बाविस्कर (प्रशिक्षक)