जळगाव ;- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध पियुष पाटील यांनी केले असून त्यांनी तक्रार अन आंदोलनाच्या अभ्यासाची गरज असल्याची टीका केली आहे . पत्रकात म्हटले आहे कि
विद्यापीठाच्या प्रतिमेची इतकीच काळजी असेल कुलगुरू यांना कटपुतलीच्या व सयाजीराव यांच्या भूमिकेतून बाहेर आणावे असा सल्ला देण्यात आला असून आमच्या तक्रारींची दखल घेतली असती तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली नसती.
आपल्या न्याय हक्कासाठी व मागणीसाठी आंदोलन हा तर संविधानाने दिलेला अधिकार आहे, असे यात म्हटले आहे.
१३ रोजी विद्यापीठात सिनेट बैठकीत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गावगुंड असा शब्द वापरत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली. तरी नितीन ठाकूर यांनी खर तर अभ्यास करण्याची गरज आहे. कारण की आतापर्यंत विद्यापीठात पी पी पाटील यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्यापासून अनेक चुकीचे ठराव अनेक चुकीच्या नियुक्त्या तसेच विद्यापीठाचा चालत असलेला भोंगळ कारभार सेच भभ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालणे इत्यादी कारणांमुळे विद्यापीठे कायम चर्चेत राहिले आहे.
आपण आतापर्यंत प्राचार्य डॉ.एल पी देशमुख यांच्या विरोधात एकूण 28 तक्रारी दिल्या होत्या तरी देखील विद्यापीठाने कुठलीच दखल घेतली जात नव्हती व प्राचार्य डॉक्टर देशमुख यांना पाठीशी घातले जात होते असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.
तसेच त्यानंतर घडलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणांमध्ये पुरावे दिल्यावर देखील प्राचार्य डॉक्टर देशमुख यांची महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून तसेच विद्यापीठाच्या एम सी मेंबर वरून हकाल पट्टी होत नव्हती व गुन्हे देखील दाखल होत नव्हते याचा जाब आपण प्रशासनाला विचारण्यासाठी विद्यापीठात एमसी मेंबरच्या मीटिंग च्या वेळी विचारण्यासाठी गेलो होतो . . . .
अशाप्रकारे आंदोलन करणाऱ्या किंवा जाब विचारणाऱ्या चळवळीतील विद्यार्थ्यांना जर सिनेट सदस्य ठाकूर गुंड म्हणून उल्लेख करत असतिल तर त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे .
विद्यापीठाची इतकीच काळजी जर श्री.ठाकूर यांना असेल तर त्यांनी माननीय कुलगुरू यांना कटपुतली च्या भूमिकेतून बाहेर आणण्यासाठी चा प्रयत्न करावा व विविध संघटना पक्षांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी असे आव्हान पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.