यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील दहीगाव येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दहीगाव येथील यावल मार्गावरील सुरेश आबानगर येथे राहणारी उच्च शिक्षीत तरूणी सुजाता संतोष पाटील ( वय २०) हिने २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपुर्वी राहत्या घरात काहीतरी विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. मयत तरूणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील (वय-४८) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी मयताचे शवविच्छेदन केले. पुढील तपास पोउनि जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.