• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

कचरा झाडल्यावर वेळेत उचलण्याच्या महापालिका कर्मचाऱ्यांना सूचना

जळगाव, (प्रतिनिधी) – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लेवा बोर्डिंग सभागृहाबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महापौरांच्या आक्रमक पवित्र्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने चक्रे फिरवली आणि तब्बल सहा-सात तास पडून असलेला कचरा अवघ्या २० मिनिटांत हटवण्यात आला.

शनिवारी सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी लेवा बोर्डिंग परिसरातील साफसफाई केली. मात्र, गोळा केलेला कचरा उचलण्याऐवजी तो सभागृहाच्या मुख्य दरवाजाजवळच ढिगाऱ्याच्या स्वरूपात सोडून कर्मचारी निघून गेले. स्थानिक नागरिकांनी कर्मचाऱ्यांना हा कचरा तत्काळ उचलण्याची विनंती केली होती, मात्र दुपारी १ वाजेपर्यंत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.

उद्घाटनाला येताच महापौरांच्या संतापात भर
लेवा बोर्डिंग सभागृहात एका प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी महापौर दीपमाला काळे दुपारी १ वाजता पोहोचल्या. सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी महापौरांना परिस्थितीची कल्पना देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या स्वीय सहाय्यकांना आरोग्य विभागाला कचरा उचलण्याचे आदेश दिले.

आरोग्य विभागाची धावपळ
महापौरांच्या संतापानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. अवघ्या अर्ध्या तासात महापालिकेचे कर्मचारी आणि कचरा उचलणारे वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि तो ढीग साफ करण्यात आला. महापौरांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. या घटनेनंतर महापौरांनी आरोग्य विभागाला स्पष्ट ताकीद दिली आहे. संपूर्ण जळगाव शहरात साफसफाई वेळेवर झालीच पाहिजे. केवळ कचरा झाडून त्याचे ढीग लावू नयेत. साफसफाई झाल्यानंतर एका तासाच्या आत तो कचरा तिथून उचलला गेलाच पाहिजे. या कारवाईमुळे कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Tags: dipmala kale madam news
Previous Post

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

Next Post

घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
1xbet russia

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026
 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा
1xbet russia

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!