• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वादळी वाऱ्याचा पावरा परिवार ठरले बळी, एकाच कुटुंबातील चौघे ठार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2024
in Uncategorized
0
वादळी वाऱ्याचा पावरा परिवार ठरले बळी, एकाच कुटुंबातील चौघे ठार !

बालक बचावला, यावल तालुक्यातील थोरपाणी पाड्यावरील घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील थोरपाणी या आदिवासी वस्तीवर रविवारी दि. २६ मे रोजी रात्री झालेल्या भयंकर दुर्घटनेत एकाच गरीब आदिवासी कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मात्र परिवारातील आठ वर्षाचा बालक सुदैवाने बचावलाआहे.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रविवारी दि. २६ मे रोजी संध्याकाळ नंतर जोरदार वादळी वारा सुरू झाला. या वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केले होते. अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी छत कोसळून अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. यावल तालुक्याला वादळी वार्‍याचा फटका बसला. यात अनेक गावांमधील शिवारांमध्ये असलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील थोरपाणी या आदिवासी बहुल वाडीवस्तीवर वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगार्‍याखाली अडकले. त्यांना श्‍वास घेण्यासाठी अडचणी आल्या. यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ), त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा ( वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई ही दोन वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. ढिगार्‍याखालून याच कुटुंंबातील शांतीलाल नानसिंग पावरा ( वय वर्षे ८) हा बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले.

त्याने बचावासाठी आरोळ्या मारून परिसरातील लोकांना बोलावल्यावर या दुर्घटनेची माहिती मिळाली. थोरपाणी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहनमाला नाझरकर आणि पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह थोरपाणी या पाड्यावर धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह ढिगार्‍याखालून काढून शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मयत नानसिंग पावरा यांचे नातेवाईक दाखल झाले आहेत.


 

 

Previous Post

भिकारी, बेवारसांची बेघर निवारा केंद्रात सुविधा : पोलीस-पालिकेच्या पुढाकाराने मदत उपलब्ध

Next Post

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी धनश्री अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची  मुलगी धनश्री अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी धनश्री अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon