• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2025
in 1xbet russia, casino, PinUp apk, खान्देश, जळगाव, जैन कंपनी, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

जैन इरिगेशनमध्ये ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) –”भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे…” असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले.


व्यसनमुक्तीनेच जीवन समृद्धीच्या दिशेने वाटचाल  होऊ शकते असे ही ते म्हणाले.  जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जैन इरिगेशन प्लास्टिक पार्क, बांभोरी आणि जैन फूड पार्क येथे सहकाऱ्यांसाठी विशेष जागृती कार्यक्रमाचे आयोजन  केले होते.
व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत डॉ .विसपुते यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. सकाळी जैन प्लास्टिक पार्कला आयोजित कार्यक्रमात त्यांनी कंपनीच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधला. त्यात ते म्हणाले की,
“देवाने माणसाचे जीवन सोपे केले, पण माणसानेच ते व्यसनांच्या आहारी जाऊन कठीण, गुंतागुंतीचे बनवले आहे,” असे सांगत, व्यसनामुळे होणाऱ्या  नुकसानांचे स्पष्ट चित्र उपस्थितांपुढे मांडले. व्यसनामुळे तोंड व शरीरास दुर्गंध येतो, प्रतिकारशक्ती घटते, आनंददायक संप्रेरकांची निर्मिती कमी होते आणि व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा ढासळते, असे त्यांनी नमूद केले.
व्यसनमुक्त होण्यासाठी त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, ध्यानधारणा करणे, कुटुंबीयांशी संवाद वाढवणे आणि सजगता विकसित करणे हे उपाय सुचवले.
विसपुते यांनी गौतम बुद्धांचा अंतिम संदेश “मोह, माया सोडा आणि सजग रहा” याची आठवण करून दिली. १९१७ मध्ये राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या ‘एकच प्याला’ या नाटकाचा संदर्भ देत असेही नमूद केले की, व्यसनाधीनतेची स्थिती १०८ वर्षा नंतर आजही बदललेली नाही, ही खेदजनक बाब बोलून दाखविली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कंपनीचे वरिष्ठ सहकारी सी.एस. नाईक यांनी प्रस्तावना केली. ‘आपला एकही सहकारी व्यसनी नसावा हा विचार कंपनीचे संस्थापक श्रद्धेय (मोठेभाऊ) भवरलालजी जैन यांनी कंपनीच्या स्थापनेपासूनच करून त्यावर प्रत्यक्ष कृती केली. आज त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने देखील त्यात सातत्य ठेवले आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने व्यसने सोडण्याचा संकल्प घेतला पाहिजे…’ असे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बोरसे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. ज्ञानेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.
जैन फूड पार्क येथे डॉ. विसपुते यांनी सहकाऱ्यांशी साधला संवाद

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जैन फुड पार्क येथील कांदा निर्जलीकरण प्रकल्पातच्या ट्रेनिंग हॉल येथे सहकाऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय पारख तर प्रमुख पाहुणे म्हणून असलम देशपांडे, डॉ. अरुण चौधरी होते.
सुसंवाद साधताना डॉ. विसपुते म्हणाले की, व्यसनी व्यक्तीमुळे कुटुंबातील पत्नी आणि लहान मुलांचेही आरोग्य धोक्यात येते, हे त्यांनी अधोरेखित केले. व्यसन केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर परिणाम करत असल्यामुळे त्यातून बाहेर पडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात त्यांनी दोन महत्त्वाचे कानमंत्रही दिले,  यात ‘१३८ फॉर्म्युला’ म्हणजे एक तास व्यायाम, तीन वेळा जेवण, आणि आठ तासांची शांत झोप. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की, मानवाला संगीत, सुगंध आणि ध्यानधारणा करणे आवडते. चांगल्या जीवनासाठी या तीन गोष्टींमध्ये आपले मन गुंतवावे असा मोलाचा सल्लाही बोलताना दिला गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पारख यांनी केले तर वक्ते डॉ. विसपुते यांचा परिचय, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कंपनीच्या गृहपत्रिकेच्या संपादकीय मंडळाचे सदस्य किशोर कुलकर्णी यांनी केले.
____
ग्रुप फोटोच्या फोटो ओळी – जैन फूड पार्क येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी सहकाऱ्यांसमवेत वक्ते डॉ नितीन विसपुते आणि मान्यवर.

फोटो ओळी – जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे ३१ मे च्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या औचित्याने कंपनीच्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, समुपदेशक डॉ. नितीन विसपुते.


Tags: “व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते#jalgaon jain company news #maharashtra
Previous Post

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इसमाकडून साडेतेरा हजाराच्या गांजासह मुद्देमाल जप्त
1xbet russia

इसमाकडून साडेतेरा हजाराच्या गांजासह मुद्देमाल जप्त

June 2, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

June 2, 2025
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात मानेचे लचके तोडल्याने बालकाचा मृत्यू
1xbet russia

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात मानेचे लचके तोडल्याने बालकाचा मृत्यू

June 2, 2025
कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इसमाकडून साडेतेरा हजाराच्या गांजासह मुद्देमाल जप्त

इसमाकडून साडेतेरा हजाराच्या गांजासह मुद्देमाल जप्त

June 2, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon