राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र शासनाचा निषेध आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) ;- पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाली असून खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला असून खतांच्या किंमती कमी न झाल्यास येत्या काही दिवसांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर करण्यात आलेल्या प्रातिनिधिक निषेध आंदोलन प्रसंगी केला . यावेळी केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कल्पना पाटील , वाल्मिक पाटील आदी यावेळी उपस्थित होते.