पाचोरा (प्रतिनिधी) – काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली असून भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
जळगाव जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडीचे प्रमुख ना. गुलाबराव पाटील यांची नुकतीच भेट जळगाव येथील अंजिठा विश्राम गृहावर पाचोरा तालुका कॉग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट घेतली. या भेटीत तालुक्याचा आढावा देत पाचोरा तालुक्यातील कॉग्रेस पदाधिकारींचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असून यासाठी वेळ मागितली असे कारण श्री. सोमवंशी यांनी देत जिल्ह्य़ाचे महाविकास आघाडीचे पालकमंत्री असल्याने कॉग्रेस पदाधिकारी यांचे कुठलेही कामे ना. गुलाबराव पाटील यांनी करण्याचे आश्वासन दिले आहे. तालुक्यातील विविध समस्यासह शासनस्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही याभेटीत ना. पाटील यांनी आश्वासित केले. असे असले तरी भेटीचे खरे कारण मात्र गुलदस्त्यात असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील शिवसेना – कॉग्रेस यांच्यात ठिणगी पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वरीष्ठ पातळीवरील भेटींना महत्व येणार आहे








