जळगाव ;- जिल्ह्यात कोरोना रुग्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर ८१६ रुग्ण आज बरे झाले आहेत .
तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे
जळगाव शहर-१२२, जळगाव ग्रामीण-२३, भुसावळ-१०६, अमळनेर-१६, चोपडा-३७, पाचोरा-२९, भडगाव-१५, धरणगाव-७, यावल-४१, एरंडोल-११, जामनेर-३०, रावेर-५०, पारोळा-२७, चाळीसगाव-८७, मुक्ताईनगर-१६१, बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ७८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख ३३ हजार २१२ रूग्ण बाधित आढळले आहे. त्यापैकी १ लाख २० हजार ९७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ८५५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १२ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.