फैजपूर पोलिसांची धडक मोहीम सुरूच
फैजपूर ता.यावल ;-फैजपुर पो स्टे हद्दीतील पाडळसा गावाजवळ गावठी हातभट्टी उध्वस्त करून दारू गळण्याचे साधनासह ,कच्चे रसायन व तयार दारू एकूण 31,500/- रु .चे मुद्देमालासह आरोपी रवींद्र उर्फ चिनी महाराज भास्कर कोळी रा .पाडळसा याला अटक करून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र कोरोना च्या वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवत असताना पाडळसा गावाजवळ हातभट्टी गावठी दारु गाळण्याचा प्रकार सुरू असल्याची माहीती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे या कारवाईमुळे गावठी हातभट्टी दारू गाळ गाळणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे ही कार्यवाही फैजपूर विभागीय डीवायएसपी नरेंद्र पिंगळे तसेच एपीआय प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहिदास ठोंबरे ,एएसआय सांगळे , किरण चाटे , विकास सोनवणे, महेश वंजारी ,उमेश सानप , आदींनी ही कारवाई केली.