जळगाव ( प्रतिनिधी )- शहरातील कन्या शाळेजवळ कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्याची सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिला बालकीसन सोमानी (वय-७२, रा. चैतन्य नगर, भुपाली अपार्टमेंट) परिवारासह राहतात. सोमवारी सायंकाळी घरातील पपईचे सालटे कचराकुंडीत टाकण्यासाठी प्रमिला सोमानी खाली आल्या.
पपईचे सालटे टाकल्यानंतर त्या घराकडे जात असतांना मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून गळ्यातील सोन्याची पोत लंपास केली. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघे दुचाकीवरून पसार झाले होते. प्रमिला सोमानी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि महेंद्र वाघमारे करीत आहे.