रावेर तालुक्यातील संतापजनक घटना
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका गावात दि. १८ रोजी दुपारी ४ वाजे सुमारास एका पाच वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे रावेर तालुका हादरून गेला असून संशय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
एका गावातील पाच वर्षे बालिका ही तीच्या आजीच्या घरी मागील एक महिन्यापासून राहत होती. रविवारी घरामध्ये बालिका एकटी असताना संशयित आरोपीने घरात कोणीही नसतांना बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली आहे.
संशयित आरोपीचे नाव वामन बळीराम घटे (बेलदार) (वय – ६५) असे आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असून या बाबत अधिक तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे सपोनी हरीदास बोचरे हे करीत आहे.