धरणगाव तालुक्यातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचपूरा येथे राहणाऱ्या ४० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतल्याने त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गजानन मन्साराम पाटील (वय-४० रा. चिंचपूरा ता.धरणगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेतीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता. दि. २७ फेब्रुवारी रोजी तो शेतात असताना त्याने विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याला उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवार ९ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजता मृत्यू झाला. या घटनेबाबत रविवारी १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.