पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वरसाडा तांडा येथे आदिवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वरसाडे तांडा येथे 28 वर्षीय विवाहिता कुटुंबीयांसह राहते. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी विवाहिता घरात एकटी असताना त्याच गावातील विकास वाल्मिक बडगुजर याने अनधिकृतपणे घरात घुसून विवाहितेसी अंगलट करत तिचा विनयभंग केल्याचे उघडकीला आले आहे. विवाहितेचा फिर्यादीवरून विकास बडगुजर यांच्यावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भरत काकडे करीत आहेत .