बातम्यांची शैली, मांडणीबाबत केले कौतूक
जळगाव (प्रतिनिधी) :- अहिराणी भाषेतील विविध वेबसिरीजमधून प्रसिद्ध झालेल्या ‘पैशेवाली ताई’ उर्फ तोंडाय आक्का विद्या भाटिया यांनी रविवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सस्नेह भेट दिली. यावेळी त्यांनी “केसरीराज” च्या बातम्यांची शैली व मांडणीचे कौतुक केले. तसेच, केसरीराज यु ट्यूब चॅनेलने अहिराणी चित्रसृष्टीला वेळोवेळी व्यासपीठ मिळवून दिले अशी दिलखुलास प्रतिक्रिया दिली.
विद्या विसनजी भाटिया ह्या गेल्या ४० वर्षांपासून रंगभूमीची सेवा करीत आहेत. मराठी नाटक, मराठी सिनेमा, अहिराणी वेब सिरीज, अहिराणी गीते, ऑर्केस्ट्रा यांच्या माध्यमातून ते आजही कार्यरत आहेत. ‘केसरीराज’ प्रॉडक्शन प्रस्तुत एक अहिराणी गीत लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्त रविवारी दि. २५ फेब्रुवारी दुपारी चर्चा करण्याकरिता व कार्यालयात सस्नेह भेटीसाठी त्या आल्या होत्या.
यावेळी त्यांचे मुख्य संपादक भगवान सोनार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्या भाटिया यांचे ‘देख तुनी बायको कशी नाची राह्यनी’ हे गीत देखील प्रसिद्ध आहे. ‘केसरीराज’ प्रॉडक्शन प्रस्तुत गीतांची माहीती घेऊन त्यांनी कौतुक केले. तसेच, नवीन गीताबाबत मार्गदर्शन केले. ‘केसरीराज’ चा अंक “तोंडाय आक्का” ने वाचला. अंकातील व पोर्टलवरील बातम्या मी नेहमी पाहते. त्यातील मांडणी व शैली दर्जेदार असते, असे त्यांनी कौतुक केले.