रावेर तालुक्यातील खिर्डी विद्यालयाचा उपक्रम
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खिर्डी बु येथील अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व ह. ल.पाटील महाविद्यालयाचे शिक्षक प्रवीण धुंदले यांनी पुढाकार घेत इयत्ता सहावीच्या हिंदी विषयात “कागज की थैली” हा द्वीतीय सत्रातील सातवा पाठ आहे. विद्यार्थाना हा पाठ फक्त शिकवलाच नाही तर प्रत्यक्षात कागदी आणि कापडी पिशव्या तयार करून घेतल्या. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रापासून व कापडी पिशव्या बनवून बाजारात त्याचा वापर करत आहे.
यामुळे प्लॅस्टीक मुक्त अभियान यशस्वी झाले. या आधीही शिक्षक प्रवीण धुंदले यांनी बचतपाठवर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वह्यांच्या पानांची बचत कशी करावी हे उपक्रम राबविल्यामुळे दिल्ली येथे आदर्श शिक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ह्या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती महाजन, पर्यवेक्षक पी. पी. देहाडे यांच्यासह शिक्षकांचे सहकार्य लाभले.