ॲड. कुणाल पवार यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात यंदापासून एम ए नाट्यशास्त्र आभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया देखल सुरु झाली आहे. विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरु व्हावा याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला यश मिळाले आहे.
भावी कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी खान्देशातील तरुणांसाठी नाट्यशास्त्र विभाग सुरु होऊन त्याबाबत अभ्यासक्रम सुरु होण्याविषयी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ॲड. कुणाल पवार यांनी कुलगुरूंना पत्र लिहून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याला यश आले असून विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु असल्याबाबत जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्यात नाट्यशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश आहे.