गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयात कान नाक घसा विभागात काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील गावामधून ४९ वर्षीय महिला तपासणीसाठी आली होती. रुग्ण उपचारासाठी दाखल झाली असता गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी मॉर्निंग राऊंडला रुग्णाची स्वत: तपासणी केली याप्रसंगी निवासी डॉ.बासू यांनी रुग्णाची हिस्ट्री सांगितली. यासंदर्भात निवासी डॉ.चारु यांनी सांगितले की, सदर महिलेला मागील एक ते दिड वर्षापासून गळ्यावर गाठ आली होती तसेच त्यावर सूजही भरपूर होती. सूज वाढत जाऊन तिचा आकार ७.५ बाय ५.५ बाय ३.५ सेमी इतका झाला. गाठीवरील सुज ही चांगली दिसत नसल्याने रुग्ण येथे आली होती. येथे आल्यावर आम्ही रुग्णाची सोनोग्राफी, एफएनएसी अर्थात सुईची तपासणी, थायरॉईड प्रोफाईल तसेच काही रक्ताच्या तपासण्या करुन घेतल्यात. सर्व तपासण्याच्या रिपोर्टनंतर लेफ्ट हेमिथायरॉईडेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिसर्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
याप्रसंगी निवासी डॉक्टर चारूलता सोनवणे, शोयकत बोशू, रितू रावल आणि जान्हवी बोरकर यांनी उपचार तर नर्सिंग विभागाने चांगली सेवा दिली. रुग्णाची भिती शस्त्रक्रियेनंतर झाली दूर थायरॉईडच्या शस्त्रक्र्रियेमुळे कायमचा आवाज बदलेल, गळ्यावर व्रण येतील अशा प्रकारच्या भिती रुग्णाच्या मनात होत्या, त्यामुळे एक ते दिड वर्ष रुग्णाने शस्त्रक्रियेसाठी टाळाटाळ केली परंतु शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अनुभवी तज्ञांद्वारे करण्यात आलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या मनातील भिती दूर झाली.
अनुभवी तज्ञांद्वारे उपचार
डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात इएनटी सर्जन डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ. विक्रांत वझे, डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ.तृप्ती भट यांच्यासह निवासी डॉक्टरांची टिम व भुलरोग तज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी यांच्या सहाय्याने लेफ्ट हेमिथायरॉईडेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी काही आवश्यक तपासण्या अल्पदरात येथे करण्यात आले असून महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली.