• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

वेळेत औषधं न मिळाल्यानं नवजात बालकांसह २४ तासांत २४ रुग्ण दगावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2023
in Uncategorized
0
वेळेत औषधं न मिळाल्यानं नवजात बालकांसह २४ तासांत २४ रुग्ण दगावले

नांदेडच्या डॉ. चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

नांदेड (प्रतिनिधी) :- ‘हाफकिन’ने औषधी खरेदीचा गोंधळ घातल्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एक धक्कादायक प्रकार नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला आहे. गेल्या २४ तासांत रुग्णालयात दर तासाला एक म्हणजेच २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. त्यामुळे नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाच्या कारभाराचे यामुळे वाभाडे निघत आहे. तर रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षाचे नेते देत आहेत.

औषधी पुरविणारी संस्था ‘हाफकिन’ ने औषधी खरेदी करून न दिल्याने गोरगरिबांचा मोठा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयांना औषधींचा पुरवठाच करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयांमध्ये सध्या औषधींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची दररोजची ओपीडी साधारणत: दोन हजारांवर आहे. या ठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम अन् शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधींच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. आजही रुग्णांना बाहेरून औषधी आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच गेल्या २४ तासांत रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या नवजात बालकांचा समावेश आहे.

रुग्णालय प्रशासन मात्र अत्यवस्थ असलेल्या अन् शेवटच्या क्षणी रेफर रुग्णांचा मयतामध्ये समावेश असल्याचा दावा करीत आहे; परंतु या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून रुग्णालयासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील १ कोटी रुपयात यंत्रसामग्री, १ कोटीची औषधी खरेदी, १ कोटी शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित १ कोटी ऑक्सिजन फ्लँटसाठी ठेवण्यात आले आहेत; परंतु चार कोटींच्या प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नाही. त्यामुळे १ कोटींची औषधी खरेदी रखडली आहे. रुग्णालयात अत्यावश्यक औषधी नसल्यामुळे शेजारील जिल्ह्याच्या रुग्णालयात एक्स्पायरी डेट संपत असलेल्या औषधींचा साठा गरज पडल्यास मागवून घेण्यात येत आहे. नेत्यांच्या वाढदिवशी औषधी भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने खरेदी केलेल्या ४० लाखांच्या औषधींचा साठा संपत आला आहे.

रुग्णालयात शेजारील चार ते पाच जिल्ह्यांतून रुग्ण येतात. अनेकजण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. पैसे संपल्यानंतर शेवटच्या क्षणी ते शासकीय रुग्णालयात येतात. आलेल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही दाखल करून घेतो. त्यामुळे मृत्यूचा आकडा मोठा दिसतो. औषधींचा तुटवडा आहे; परंतु औषधी नसल्याने रुग्णाचा जीव गेला असे म्हणता येणार नाही. लवकरच ‘डीपीडीसी’च्या निधीतून औषधी खरेदी करण्यात येणार आहे, असे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी सांगितले.


Tags: #nanded civil hospital newshttps://kesariraj.com/velet-aoushad-n-milalyane/
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महापुरुषांची जयंती उत्साहात

Next Post

आयशर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, ५ मजूर मृत्युमुखी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आयशर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, ५ मजूर मृत्युमुखी

आयशर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, ५ मजूर मृत्युमुखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जैन कंपनी

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी
1xbet russia

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !
1xbet russia

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !

May 17, 2025
सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
1xbet russia

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

May 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon