अँटीकरप्शन विभागाची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष भागवत प्रजापती (वय-३२, रा. आदर्श नगर कक्ष, जळगाव असे अटक केलेल्या वरीष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. शहरातील एका भागात राहणारे तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे ईलक्ट्रीक मिटर आहे. दरम्यान त्यांचे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी तक्रारदाराला २५ हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पथकाने सापळा रचून वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती याला २५ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले.
पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पो.नि. अमोल वलसाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाणे, पो.कॉ अमोल सुर्यवंशी, पो. कॉ.प्रणेश ठाकुर यांनी कारवाई केली.