जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च व डॉ वर्षा पाटील वुमेंस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. चेतन सरोदे यांनी प्रतिमेस माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे कामकाज प्रा. चारुशीला चौधरी यांनी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके व डॉ. वर्षा पाटील वुमेन्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निलिमा वारके यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिले. याप्रसंगी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमास दोघी महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.