अमळनेर तालुक्यात बोहरा येथे कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोहरा येथे महसूल विभागाच्या पथकाने दि. १२ रोजी पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले.
सदर ट्रॅक्टर मधील रेती उपसल्याने सदर खाली ट्रॅक्टर अमळनेर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. पथकात मनोहर भावसार ग्राम महसूल अधिकारी, पी. एस. पाटील मंडळ अधिकारी वावडे भाग, भुषण पाटील ग्राम महसूल अधिकारी, बोहरा, कल्पेश कुँवर, ग्राम महसूल अधिकारी रणाईचे, सचिन बमनाथ, ग्राम महसूल अधिकारी, ए. बी. सोनवणे ग्राम महसूल अधिकारी, अमळनेर, अमोल चक्र, ग्राम महसूल अधिकारी तसेच आशीष पारधे ग्राम महसूल अधिकारी, जोगी, ग्राम महसूल अधिकारी व अभिमन जाधव, ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश होता.